नागपूर : Maharashtra Assembly Winter Session 2024 |बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातीम मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृण हत्येचा निषेध करत विरोधकांनी सभात्याग केला. गडचिरोलीतील नक्षलवादाचे आव्हान स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी तेथील पालकमंत्री पद स्वीकारले होते. तसेच आता बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पॅटर्नचा बीमोड करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावे, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी यासंदर्भातील औचित्याच्या मुद्दा मांडताना केला.
बीड जिल्ह्यात एका सरपंचाची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. अद्याप आरोपी सापडला नाही. आरोपी वाल्मिकी कराडला दोन दोन सुरक्षा रक्षक आहेत. जिथे आमदाराला एक सुरक्षारक्षक मिळतो तिथे आरोपीला दोन सुरक्षारक्षक आहेत. बीड येथील या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिकी कराडवर केवळ खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्यावर खुनाचा कट आणि खुनाचा गुन्हा नोंदविला नाही. या आरोपीचे काॅल रेकाॅर्ड तपासल्यास त्याचा या हत्याकांडातील सहभाग स्पष्ट होतो.
देवेंद्र फडणवीस यांनी एक आव्हान म्हणून गडचिरोलीचे पालकमंत्री घेतले. तशाच पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद घ्यावे आणि बीडमध्ये जो गुन्हेगारी पॅटर्न तयार होत आहे त्याचा बीमोड करावा, अशी मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी औचित्ताच्या मुद्दयाद्वारे मांडला. या अधिवेशनात जर कारवाई नाही झाली तर जिल्ह्याग आंदोलन होईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तर, अत्यंत क्रुर पद्धतीने बीडमध्ये या सरपंचाची हत्या झाली आहे. चांगले काम करणाऱ्या सरपंचाचे डोळे जाळण्यात आलेन आठ दिवस उलटूनही मुख्य आरोपीला अटक झाली नसल्याचा मुद्दा नमिता मुंदडा यांनी मांडला. तसेच, आरोपीला अटक करून फासावर लटकाविण्याची मागणीही केली. जिल्ह्यात संतापाचे वातावरण असल्याचेही त्या म्हणाल्या. तर, बीड आणि परभणीतील घटनेचा निषेध म्हणून सभात्याग करत असल्याची नाना पटोले यांनी सांगितले आणि विरोधकांनी सभात्याग केला.