नागपूर

Hailstorm in Vidarbha : विदर्भात गारपीटीवर आमचं लक्ष, सर्व परिस्थितीवर सतर्कतेचा इशारा : उपमुख्यमंत्री फडणवीस

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : शनिवारी (दि. ११) रात्री विदर्भातील अमरावती, वर्धा जिल्ह्यातील काही भागात गारपीट झाली. या अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काल आणि आजही काही भागात गारपीट किंवा अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या सगळ्या परिस्थितीवर आमचं लक्ष आहे आणि तसे अलर्ट देखील देण्यात आले आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Hailstorm in Vidarbha)

फडणवीस नागपुरातील विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं नुकसान होईल त्या ठिकाणी आम्ही सरकार म्हणून मदत करत तर आहोत मात्र शेतकऱ्यांचे आकस्मिक नुकसान होऊ नये यासाठी त्या ठिकाणी अलर्ट देण्यात आले आहेत. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज जाहीर कार्यक्रमात केलेल्या टीकेला उत्तर देताना कोण संजय राऊत ? असा खोचक सवाल फडणवीस यांनी करीत अधिक बोलणे टाळले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT