Thackeray Shinde conflict
नागपूर: मुंबई विकणाऱ्यांनी आमच्यावर आरोप करू नये. आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हाऊसिंग फॉर ऑल हे स्वप्न पूर्ण करतोय, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करीत ठाकरे शिवसेनेवर हल्लाबोल केला.
महापालिकेच्या निवडणुका पाहता हा निर्णय घेण्यात आला, अशी टीका विरोधकांनी केली. त्यावर उत्तर देताना विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'हा निर्णय जनतेच्या हिताचा आहे. यामुळे मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या लोकांना मुंबईत येता येईल. आमच्या निर्णयावर टीका करणाऱ्यानी त्यांच्या काळात निर्णय का घेतला नाही. हा लोकप्रिय घोषणाचा पाऊस नसून अंमलबजावणी आहे, अशा शब्दांत सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले.
दरम्यान, शिंदे म्हणाले शेतकऱ्याचा मुलगा शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री झाला, हे त्यांना सहन होत नाही. आयत्या बिळावर नागोबा, गांडूळाने फणा काढू नये, या उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले,'उद्धव ठाकरे हेच आयत्या बिळावर नागोबा आहेत. त्यांना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला, हे पचत नसेल, तर त्यांना जमालगोटा द्यावा लागेल.