file photo
नागपूर

Nagpur Crime News | मद्यधुंद डॉक्टर तरुणीचा भररस्त्यावर गोंधळ, पोलिसांशी वाद

Social Media Video Viral | समाजमाध्यमांवर चित्रफित व्हायरल, तरुणीच्या कारची दुचाकीला धडक

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : एका मद्यधुंद कारचालक डॉक्टर तरुणीने एका दुचाकीचालकाला धडक दिल्यानंतर त्याच्यासोबत वाद घालून रस्त्यावर गोंधळ घातला. इतक्यावरच न थांबता तिने पोलिसांशीही वाद घातला. कोतवाली पोलिसांनी त्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. तरुणीच्या गोंधळामुळे रस्त्यावर मोठी गर्दी जमली. त्या तरुणीच्या गोंधळाची चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. डॉ. क्षिप्रा (२५) असे आरोपी तरुणीचे नाव असून ती एमबीबीएसच्या अंतिम वर्षाला आहे.

कोतवाली हद्दीतील राम कुलर चौकात डॉ. क्षिप्रा ही शनिवारी सकाळी अकरा वाजता मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होती. क्षिप्राने एका दुचाकीला धडक दिली. दुचाकी चालक निकिलेश ठाकरे याने दुचाकीच्या झालेल्या नुकसान भरपाईबाबत विचारणा केली. मात्र, क्षिप्राने त्याला शिवीगाळ करीत उलट कारचेच नुकसान झाल्याचा दावा केला.

या वादात काही नागरिकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिने नागरिकांनाही दम दिला. काही वेळातच कोतवाली पोलीस पोहचले. त्यांनी तरुणीला कारमधून बाहेर निघण्यास बजावले. मात्र, तिने पोलिसांशीही हुज्जत घातली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची वैद्यकीय चाचणी केली. ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पालकाला पोलीस ठाण्यात बोलावत तिला त्यांच्या ताब्यात देण्यात आले. डॉ. क्षिप्राला गोंधळ घालताना अनेकांनी मोबाईलने तिची चित्रफित बनवली आणि माजमाध्यमांवर प्रसारित केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT