सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले Pudhari
नागपूर

Drought In Maharashtra | शरद पवार यांनी मांडलेल्या १७ मागण्यांना तातडीने मंजुरी द्या; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू

नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सलील देशमुख यांचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Rural NCP

नागपूर : महाराष्ट्रात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पिकांचे अपरिमित नुकसान झाले असून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात कोणती मदत मिळणार आणि काय उपाययोजना केल्या जाणार, याबाबत कोणतीही स्पष्टता केलेली नाही.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्य सरकारकडे मांडलेल्या १७ मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आणि आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष सलील देशमुख यांनी दिला आहे.

यासंदर्भात सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नागपूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी चंद्रशेखर कोल्हे, अविनाश गोतमारे, किशोर गजबे, वैशाली टालाटूले,अंजली साळवे, दिनेश साळवे, दिनेश बंग, गणेश चन्ने, कपिल वानखेडे, नाना केणे, विजय चिकटे, सचिन आमले, सुनील कापसे, गौरव गजघुमे, अभिषेक सोमकुवर उपस्थित होते.

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी राज्य शासनाकडे १७ तातडीच्या मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये वंचित तालुके दुष्काळग्रस्त घोषित करणे, संपूर्ण जमीन महसूल व वीज बिले माफ करणे, शेतकरी व बचत गटांची कर्जे माफ करणे, शाळा-महाविद्यालयांचे शुल्क माफ करणे आणि मनरेगाचे निकष शिथिल करून कामे सुरू करणे यांचा समावेश आहे.Nagpur

तसेच, शेतकरी व शेतमजुरांना प्रति कुटुंब २५ किलो मोफत धान्य, शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १ लाख रुपये व शेतमजुरांना २५ हजार रुपये थेट आर्थिक मदत आणि पशुधनासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय दुष्काळावर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे ३ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवून दसरा-दिवाळीपूर्वी मदत खात्यात वर्ग करावी, अशी आग्रही मागणी पवार यांनी केली असल्याचे सलील देशमुख यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनाचा इशारा

शासन व प्रशासनाने या सर्व मागण्यांची गंभीर दखल घेऊन प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी करावी; अन्यथा नागपूर ग्रामीणच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष केला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे सलील देशमुख यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT