I will break the tyranny in Pune, the Chief Minister vowed!
नागपूर- पुण्यातल्या उद्योगातील राजकीय दादागिरी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना यावर परखड भाष्य केले. सर्वपक्षीयांनी उद्योगांमध्ये अनावश्यक दादागिरी मोडून काढायलाच हवी. मी तर ती मोडून काढणारच आहे आणि या संदर्भात जे जे कोणी सोबत येतील त्या सर्वांचे स्वागत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुळात जनसुरक्षा कायद्याचा विरोध तो न वाचणारेच करीत आहेत. सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर याचा वापर नाही तर जे कायदा जुमानत नाही त्यांच्यासाठी तो आहे. तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाहीत त्यामुळे तुमच्यावर या कायद्याने कारवाई होणार नाही असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा असा इशारा आज ठाकरे यांनी दिला. यासोबतच मराठी तर अनिवार्य आहेच पण हिंदी आवश्यक आहे या शब्दात निर्णयाचे समर्थन केले. एकीकडे भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीसाठी पायघड्या घालायच्या हे धोरण बरोबर नाही असा टोला उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील प्रश्नावर लगावला. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील विजेती दिव्या देशमुखच्या जाहीर नागरी सत्काराच्या निमित्ताने त्यांनी केलेली राजकीय टोलेबाजीही चर्चेत आली.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या मंत्रिमंडळात दिव्याच्या सन्मानाचा प्रस्ताव पारित करताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की नागपूरचे लोक बुद्धिबळात बुद्धिवान आहेत. "आम्ही पण बुद्धिबळ खेळतो पण ते राजकारणात असते आणि वेळप्रसंगी चेकमेटही असते यावर त्यांनी भर देत विरोधकांना इशारा दिला. दिव्याने हिने भारताचा सन्मान वाढवला या खेळात चीनचे वर्चस्व मोडून हम्पी आणि दिव्याने विजय मिळवला.दुसरा आनंद माझ्या महाराष्ट्राची कन्या दिव्याने जागतिक स्तरावर मान उंचावली आणि नागपूरकर म्हणून माझ्या नागपूरचा मान उंचावला याचा अधिक आनंद आहे. जिने आपला सन्मान वाढवला तिचा आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने सन्मान केला. सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
19 व्या वर्षी आजकाल मोबाईल हातातून सुटत नाही अशात स्वतःला वेगळं ठेवून दिव्याने विजय मिळवला. मी देखील खूप मोठा क्रिकेटचा फॅन आहे मात्र क्रिकेट मध्ये केवळ सात आठ देश खेळतात. बुद्धिबळात शंभर देश खेळतात त्यामध्ये दिव्याने विजय मिळवला.आपल्या खेळाडूंना वेगवेगळ्या खेळात प्राविण्य द्यायचं असेल तर परदेशी प्रशिक्षक देखील उपलब्ध करून दिले पाहिजेत. कारण आता खेळ प्रोफेशनल झाला आहे. आज तीन कोटी रुपयाचा चेक दिला. आणि चेक खोटा नाही थेट दिव्याच्या खात्यात तीन कोटी जमा करण्यात आलेत... उधारी नाही..असेही मिश्कीलपणे मुख्यमंत्री म्हणाले.