Devendra Fadnavis (Pudhari Photo)
नागपूर

Maharashtra Local Body Polls | राज्यातील महापालिका निवडणुका कधी?: मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत

Devendra Fadnavis | सर्वांना आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे

पुढारी वृत्तसेवा

Maharashtra Municipal Elections

नागपूर: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता सर्वांना आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीची प्रतीक्षा लागली आहे. महापालिका निवडणूक जानेवारीत होऊ शकते, असे संकेत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

नागपुरातील त्यांच्या परंपरागत दक्षिण पश्चिम मतदार संघात आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात त्यांनी कार्यकर्त्यांना या संदर्भात कामाला लागण्याचे संकेत दिले. गेली साडेतीन वर्षे महापालिका निवडणुका न झाल्याने आजी-माजी नगरसेवक अस्वस्थ आहेत. प्रशासक राज सुरू असल्याने कामे खोळंबल्याने सर्वसामान्य जनता देखील त्रस्त आहे. निवडणूक न झाल्याने जनतेशी संपर्क कमी झाला.

मात्र, आता जानेवारी महिन्यात निवडणुका होणार असल्याने सज्ज व्हा, पूर्ण क्षमतेने कार्य करा, गेल्यावेळी महापालिकेत 108 जागा आपण जिंकल्या होत्या. यंदा त्यापेक्षा अधिक जागा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यासोबतच नागपूर पदवीधर मतदारसंघ जो गेल्यावेळी काँग्रेसच्या ताब्यात गेला होता. काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी माजी महापौर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावंत संदीप जोशी यांचा पराभव केला. हा मतदारसंघ परत मिळवण्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. त्यादृष्टीने आतापासून तयारीला लागा, असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT