Devendra Fadnavis on Uddhav Thackeray pudhari photo
नागपूर

Devendra Fadnavis : शिवसेनेची विचारधारा टिकवता न आलेले कोणत्या सत्तांतराबद्दल बोलत आहेत? CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसैनिकांनी खरी शिवसेना उभी केली

पुढारी वृत्तसेवा

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : "उद्धव ठाकरे यांना शिवसेनेची मूळ विचारधारा टिकवता आली नाही. त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून फारकत घेतली. म्हणूनच बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसैनिकांनी खरी शिवसेना उभी केली आहे. ज्यांना शिवसेनेची मूळ विचारधारा टिकवता आली नाही, ते कोणत्या सत्तांतराबद्दल बोलत आहेत? " अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

भारतात संविधानाचा आदर केला पाहिजे

माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, मी यापूर्वीही स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतात संविधानाचा आदर केला पाहिजे. देशातील निर्णय संविधानानुसार आणि संसदीय लोकशाहीच्या माध्यमातून घेतले जातात. लोकशाहीत निवडणुकांमधून जनतेचा कौल ठरतो आणि त्यानुसार लोकप्रतिनिधी निवडले जातात. यापुढेही नरेंद्र मोदीच निवडून येतील, असा आम्हाला विश्वास आहे.

भारत म्हणजे काही श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश किंवा पाकिस्तान नव्हे

विरोधकांना एवढेच सांगायचे आहे की, भारत हा संविधानावर चालणारा देश आहे. तुमच्या काही इच्छा किंवा अपेक्षा असतील, तर त्या लोकशाही मार्गाने आणि निवडणुकांच्या माध्यमातूनच पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ किंवा पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये आंदोलनांच्या माध्यमातून संविधानविरोधी मार्गाने काही गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न झाला; असा प्रयत्न भारतात केला जात असेल, तर भारतात अशा गोष्टी कधीही यशस्वी होणार नाहीत. कारण हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपले म्हणणे मांडण्याचा आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या पूर्ण करण्याचा अधिकार दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT