Devendra Fadnavis (Pudhari File Photo)
नागपूर

Devendra Fadnavis Statement | अजित पवारांच्या मृत्यूचे राजकारण दुर्देवी; मुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यातील अतिशय प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व, मोठे नेते होते.

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या घटनेबाबत होणारा वाद अतिशय निरर्थक आणि चुकीचा आहे. प्रत्येक व्यक्ती यातून स्वतःचे राजकारण कसे करता येईल हाच प्रयत्न करीत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना केला.

खासदार औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटनानंतर ते बोलत होते. नागपूर, विदर्भातील गुंतवणुकीच्या कराराचे त्यांनी त्यापूर्वी स्वागत केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राज्यातील अतिशय प्रसिद्ध असणारे व्यक्तिमत्व, मोठे नेते होते.

अजितदादा पवार हे दुर्दैवाने आपल्यातून निघून गेले आहेत. या घटनेनंतर प्रत्येक व्यक्ती आपल्या पद्धतीने तर्कवितर्क लावत आहेत. प्रत्येक व्यक्ती त्यांच्या माध्यमातून खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत हे अतिशय दुर्देवी आहे असेही टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT