prostitution racket Pudhari
नागपूर

Nagpur Crime News: देहव्यापाराविरोधात मोठी कारवाई; गंगा-जमुना परिसरातून युवतीची सुटका

सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; मुख्य महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल, अन्य संबंधितांचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शहरात अवैध देहव्यापाराविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेने गुरुवारी लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंगा-जमुना परिसरात मोठी कारवाई केली. या छाप्यात एका पीडित युवतीची सुटका करण्यात आली असून मुख्य महिला आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा-जमुना परिसरातील दिल्ली गल्ली येथील एका घरात आर्थिक फायद्यासाठी एका युवतीला कमी कालावधीत अधिक पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यवसायात ढकलले जात असल्याची गुप्त माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर दोन पंच आणि एका बोगस ग्राहकाच्या (डिकॉय पंटर) मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान पोलीसांनी घटनास्थळावरून पीडित युवतीची सुरक्षित सुटका केली. प्राथमिक तपासात आरोपी महिला ग्राहकांची व्यवस्था करून संबंधित युवतीकडून देहव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी लकडगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 395/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 143(2)(3) तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 मधील कलम 3, 4, 5 आणि 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्नीबाई सुरेश कालखोर (वय 65), रा. गंगा-जमुना परिसर, व्यंकोबा मंदिर रोड, नागपूर यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच या अवैध कारवायांमध्ये इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास पोलीसांकडून सुरू आहे.

पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेली ही कारवाई मानव तस्करी आणि देहव्यापाराविरोधातील मोहिमेतील महत्त्वपूर्ण यश मानली जात आहे. अशा अवैध कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरोधात पुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT