Liquor  Pudhari
नागपूर

Illegal Liquor Nagpur | रेल्वे स्थानकासमोरील पानठेल्यावर देशी दारूचा साठा; २३७ बाटल्या जप्त

सिताबर्डी पोलिसांची कारवाई; प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर  सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पानठेल्यावर पोलिसांच्या एस्कॉर्ट पथकाने कारवाई करून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह देशी दारूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत देशी दारूच्या तब्बल २३७ बाटल्या आढळून आल्या असून, एकूण सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पानठेला चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ३० ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पंचांच्या उपस्थितीत रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील पानठेल्याची झडती घेण्यात आली. यावेळी विविध कंपन्यांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे पुडे तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या देशी दारूच्या २३७ बाटल्या पोलिसांना आढळून आल्या.

पोलिसांनी पानठेला चालक आयुष सतीश माडगोविंदवार (२३, रा. खलाशी लाईन, गोंड मोहल्ला, नागपूर) याच्या ताब्यातून प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि देशी दारूसह सुमारे १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ व देशी दारूची अवैध विक्री करण्याच्या उद्देशाने हा साठा ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी सिताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT