Seminary Hill Cobra in Helmet
नागपूर : सध्या थंडीचे दिवस असल्याने बाहेर निघण्यापूर्वी डोक्याचे हेल्मेट, पायातील चप्पल किंवा बूट, कपडे अशी कुठलीही वस्तू एकदा तपासून, झटकून घ्या, असेच म्हणण्याची पाळी एका घटनेने आली आहे.
सेमिनरी हिल परिसरातील ही घटना असून वन्यजीव संरक्षक शुभम जी.आर. यांनी मिताली चतुर्वेदी यांच्या कुटुंबाला त्यांच्या हेल्मेटमध्ये लपलेल्या विषारी नागापासून या माध्यमातून वाचवले. आज (दि.३१) दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, अचानक हेल्मेटमधून एका कोब्रा नागाचा आवाज आला. कोब्रा पाहून सेमिनरी हिल्स मानव सेवा येथे राहणारे चतुर्वेदी कुटुंब घाबरले.
फोनाफोनी झाल्याने वसाहतीतील लोकांची गर्दी जमू लागली. दरम्यान, या घटनेची माहिती नागपूरच्या प्रसिद्ध वन्य प्राणी आणि निसर्ग मदत संस्थेच्या टीमचे अध्यक्ष शुभम जी.आर. यांना देण्यात आली.
धाडस दाखवित त्यांनी हेल्मेटमध्ये लपलेल्या या विषारी नागाला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि नैसर्गिक अधिवासात, जंगलात सोडले! साप अनेकदा निवारा आणि अन्न शोधण्यासाठी आपल्या घरात येतात, असे शुभम यांनी स्पष्ट केले.