नागपूर : पुढारी वृत्तसेवा
बीड येथील घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतली असून, मोर्चे काढण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. कुणालाही वाचवले जाणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. नागपुरात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, बीडच्या प्रकरणात सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने आवश्यक कारवाई करीत आहेत. या प्रकरणांमध्ये काहीही झाले तरी कुणालाही वाचवण्याचा कुणी प्रयत्न केला तरी, आम्ही तसे कुनालाच वाचवू देणार नाही. मी आधीही सांगितले आहे. जे जे कुणी यात दोषी आहेत. या प्रकरणाच्या निमित्ताने जे लोक दादागिरी करताहेत किंवा जे लोक हफ्ते वसुली करतात अशा सगळ्यांवर जरब बसविण्याचे आम्ही ठरवले आहे. त्यामुळे या संदर्भात योग्य ती कारवाई सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.