Nagpur Accident News
रिल्स बनवण्याच्या नादात कारला अपघात File Photo
नागपूर

नागपूर : रिल्स बनविण्याच्या नादात उलटली कार; दोन युवक ठार, तीन गंभीर

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मित्राकडे पार्टी केल्यानंतर कारने फेरफटका मारण्यासाठी निघालेल्या पाच विद्यार्थी मित्रांनी इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे सुरु केले. चालकही यामध्ये सहभागी झाल्याने कार उलटली. ही रील सोशल मीडियावर आली पण ती जीवघेणी ठरली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात मंगळवारी पहाटे तीन वाजता पांजरा येथील बीएसएनएलच्या कार्यालयाजवळ झाला. विक्रम गादे (वय २०, महादुला) आणि आदित्य पुण्यपवार (वय २०,चार्मोशी, गडचिरोली) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमींमध्ये जय संजय भोंगाडे, सुजल प्रमोद चव्हाण, सुजय राजन मानवटकर (सर्व रा. महादुला, कोराडी) यांचा समावेश आहे.अपघातातील पाचही युवक २० ते २१ वयोगटातील आहेत.

यातील विक्रम गादे हा विधी पदवीचे शिक्षण घेत होता. तर आदित्य पुण्यपवार हा महादूला येथील सोनेकर कॉलेज ऑफ फार्मसीचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. महादुला येथे तो भाड्याने मित्रासोबत राहत होता. जय संजय भोंगाडे व सुजल प्रमोद चव्हाण हे दोघे बीटेक द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत सुजय मानवटकर हा औषध शास्त्रामध्ये द्वितीय वर्षाला आहे. विक्रम गादे हा एका वकिलाकडे मदतनीस म्हणून कामही करीत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम गादे याच्या घरी पार्टी होती. पाचही जणांनी जेवण केल्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाचही मित्र कारने महादूल्याकडून नागपूरच्या दिशेने निघाले. गाडीत एक मित्र इंस्टाग्रामवर रिल्स बनवायला लागला. चालकानेही सहभाग घेण्याचा प्रयत्न केला पण कारवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. अपघात इतका भीषण होता की, कार महामार्गावरील सहा बॅरिकेड्स तोडून सर्व्हिस मार्गावर आदळली. कारचा चुराडा झाला. कारमध्ये मासाचे व हाडांचे तुकडे पडले होते. जखमींपैकी सुजल चव्हाण व सुजय मानवटकर यांना बोकारा येथील रुग्णालयात तर जय भोंगळे याला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

SCROLL FOR NEXT