गोळीबार झालेली कार. Pudhari Photo
नागपूर

खापरखेडा येथे पूर्ववैमनस्यातून कारवर गोळीबार

Nagpur Crime News | एकाचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे भरदिवसा पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा आणि खापरखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पवन धीरज हिरणवार (रा. काचीपुरा, नागपूर) असे मृतकाचे नाव आहे. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन हा त्याच्या दोन मित्रांसह खापरखेडा येथील बाभूळखेडा संकुलातून कारने जात होता. दरम्यान, मागून तीन दुचाकींवरील पाच ते सहा जण आले आणि त्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. यात पवनचा जागीच मृत्यू झाला त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले. घटनेची माहिती मिळताच खापरखेडा पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. कुख्यात शेखूच्या भावाच्या हत्येप्रकरणी पवन हिरनवार हा आरोपी होता. यातूनच हे हत्याकांड घडल्याचे बोलले जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT