नागपूर

Nagpur Hit And Run Case : नागपुरातील ‘हिट अँड रन’ प्रकरणातील कार चालकास अटक

करण शिंदे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील गिट्टीखदान परिसरात (दि.७) मे रोजी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन महिलांना एका कारचालकाने अमानुषपणे उडविले आणि पळून गेला. या अपघाताचे व्हिडिओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत . सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने अपघाताच्या 23 दिवसानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला गुरुवारी (दि.30) रात्री अटक केली. कमलेश विश्वकर्मा (वय 23, रा. अनंतनगर) असे वाहन चालकाचे नाव आहे. तो ओला कार चालवण्याचे काम करतो. (Nagpur News)

यापूर्वी पोलिसांनी या आरोपीला केवळ नोटीस देवून सोडून दिले होते. दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी (दि. 31) या घटनेच्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत ठोस कारवाई करण्याची मागणी केली. देशमुख यांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ममता संजय आदमने यांची भेट घेतल्याने वातावरण तापले. (Nagpur News)

नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन दोषीवर कारवाई करावी. तसेच या अपघातामध्ये ज्या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत, त्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी पुर्ण उपचार न करता रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला. या दोन्ही जखमी महिलांवर शासकीय खर्चाने उपचार करावेत, अशी मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना केली. (Nagpur News)

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT