नागपूर - राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण आणि त्यांचे दीर्घकालीन नियोजनबद्ध विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, या उद्दिष्टासाठी एक उच्चस्तरीय मंत्रिगट समिती गठीत करण्यात आली आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना नियुक्त करण्यात आले असून ग्रामविकास मंत्री आणि रोजगार हमी योजना मंत्री हे सदस्य म्हणून समितीत असतील.या समितीत विविध विभागांचे मंत्री आणि आमदारांचा समावेश असून, त्यात राज्यमंत्री, विधानसभेचे सदस्य आणि विधानपरिषदेचे सदस्य यांचा समावेश आहे.
या निर्णयामागील प्रमुख हेतू म्हणजे शेतीमधील कामांसाठी व यंत्रसामग्रीच्या वापरासाठी चांगल्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन, शेत रस्त्यांचे मजबुतीकरण व गुणवत्ता सुधारणा करणे. यामुळे उत्पादन, वाहतूक आणि शाश्वत शेतीविकासाला चालना मिळणार आहे.