नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले.  Pudhari
नागपूर

Bjym Nagpur University Protest | 'भाजयुमो'ची नागपूर विद्यापीठावर धडक; कुलगुरूंना 20 कुंड्या दिल्या भेट

नागपूर विद्यापीठातील भोंगळ कारभार आणि विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या परीक्षा याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन

पुढारी वृत्तसेवा

Bhartiya Janata Yuva Morcha Agitation Rtmnu

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाद्वारे शुक्रवारी (दि. २९) आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भोंगळ कारभार आणि विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या परीक्षा, निकालांमधील गोंधळ यांमुळे सामान्य विद्यार्थ्यांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होते. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे कुलगुरू यांना दोनदा निवेदन देण्यात आले.

समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली. परंतु, अत्यंत खेदाची बाब म्हणजे ही मुदत संपूनही विद्यापीठ प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.​ विद्यार्थ्यांना होणारा त्रास जशाच्या तसाच असून विद्यापीठाच्या या उदासीन आणि सुस्त कारभाराचा जाब विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाने धडक दिली.

कुलगुरूंना विद्यार्थ्यांच्या २० समस्यांसाठी कुंड्या देण्यात येणार असून त्या कुंड्या पाहून तरी त्यांना विद्यार्थ्यांच्या त्रासाची जाणीव होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT