File Photo
नागपूर

भाजपचे संघटन पर्व : बावनकुळे, चव्हाण तीन दिवस दौऱ्यावर

१३ ते १५ फेब्रुवारी दरम्‍यान करणार उत्तर महाराष्‍ट्र, विदर्भात प्रवास

पुढारी वृत्तसेवा

नागपूर प्रतिनिधी - भाजपाच्या 'संघटन पर्व' अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस महाराष्ट्र प्रवासावर आहेत.

कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण या प्रवासात सोबत असणार असून, राज्यातील विविध मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीसह संवाद साधणार आहेत. राज्यातील ४७ संघटनात्मक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकी व विभागीय कार्यशाळा यानिमित्ताने घेण्यात येणार आहेत.

गुरुवारी, १३ फेब्रुवारी रोजी अकोला येथे हॉटेल सिटी स्पोर्ट्स येथे सकाळी १० वाजता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक. दुपारी ३ नागपूरच्या जगनाडे चौकातील हॉटेल रिजंटा येथे पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. सायंकाळी ७ वाजता पश्चिम नागपुरात कृष्ण ग्रीन लॉन कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शुक्रवारी, १४ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता नांदेड येथे भक्तिलॉन येथे बैठक घेतील. दुपारी ३ वाजता गुरु लॉन्स अँड फंगशन हॉल, छत्रपती संभाजी नगर येथे बैठक होणार आहे.

शनिवार,१५ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे बैठक होणार असून, त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नाशिक येथील लंडन पॅलेस हॉल येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT