नागपूर

भाजपा इलेक्शन मोडवर, अध्यात्मिक आघाडी घेणार संत महंतांचे मेळावे

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान करण्याच्या निश्चयाने संघ परिवारासह इतरही संघटना कामाला लागल्या असून अध्यात्मिक आघाडीतर्फे 15 फेब्रुवारी पासून राज्यभर संत-महंतांचे मेळावे आयोजित केले जाणार आहेत.

मिशन २०२४ च्या महाविजयासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण देशभरात "सुफी' संवादाद्वारे मोदींच्या मुस्लिम कल्याणाच्या योजना पाेहोचवण्यात येत असतानाच हिंदु समाजातील विविध साधु संतांचे मेळावे राज्यात घेण्यात येणार आहे. सुरूवात येत्या १५ फेब्रुवारीला मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय मेळाव्यापासून होत असल्याची माहिती भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी दिली. सर्व लोकसभा समन्वयक त्या धर्माचार्य तसेच प्रमुखांना घेऊन एक मेळावा घेतील. यासाठी साधु संत तसेच कीर्तनकार, प्रवचनकार प्रचार करीत आहे. यासाठी ४८ लोकसभेचे ४८ संयोजक नेमण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय, शैव संप्रदाय, महानुभाव संप्रदाय तसेच वारकरी संप्रदाय, रामदासी, स्वामी समर्थ परिवार, तुकडोजी महाराज परिवार, गायत्री परिवार, श्री सेवक परिवारासह कीर्तनकार, प्रवचनकार, साधु, संत, महंताशी समन्वय आणि संपर्क वाढविला जात आहे.आतापर्यत ४०९ प्रमुख धर्माचार्य तसेच संत महंतांशी संपर्क आणि संवाद झाला आहे. पंडित प्रदीप मिश्रा, बागेश्वरबाबा, संजय महाराज पाचपोर, रामदेवबाबा, श्री श्री रविशंकर आदींसह सुमारे तीन हजार कीर्तनकारांपर्यत ही अध्यात्मिक आघाडी पोहोचल्याची माहिती मिळाली.

SCROLL FOR NEXT