Nagpur BJP party entry cancelled
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांचे पक्षप्रवेश जिल्हा भाजपने अखेर रद्द केले आहेत. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि स्थानिक आमदार आशिष देशमुख यांनी या परस्पर पक्ष प्रवेशावर नाराजी व्यक्त केल्यानंतर हे प्रवेश रद्द झाले आहेत.
पालकमंत्री बावनकुळे यांचा या पक्षप्रवेशाशी कुठलाही संबंध नाही, असेही सोमवारी (दि.२४) जिल्हा भाजपचे अध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. नरेंद्र पिंगळे आणि अमित राय यांचा भाजप प्रवेश रद्द करण्यात आला आहे. जिल्हा भाजपने केलेल्या या प्रवेशाबाबत बावनकुळे आणि आ. आशिष देशमुख यांना कल्पना नव्हती. आम्ही जिल्हा स्तरावर पक्ष प्रवेश घेतले आहेत, ते आता रद्द झाले आहेत. गैरसमजातून हे दोन्ही पक्ष प्रवेश झाले होते असेही कुंभारे यांनी नमूद केले आहे.