नागपूर: एकीकडे विरोधक भाजपवर वेगवेगळ्या कारणांनी टीकास्त्र सोडत असताना मनपा निवडणूकीच्या दृष्टीने भाजप मायक्रोप्लेनिंगने कामाला लागली आहे. शहरातील असंतुष्ट नाराजी, बंडखोरी आणि केवळ आठ दहा दिवसच प्रचारासाठी मिळणार असल्याने नागपूर शहराव्यतिरिक्त नागपूर ग्रामीण मधील लोकप्रतिनिधी,पक्षाचे पदाधिकारी व संघटनेमध्ये काम करणाऱ्या 61 प्रमुख कार्यकत्यांना मनपा निवडणूकीसाठी प्रभागनिहाय विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी नागपूर शहर कार्यालयात शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेत निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके, निवडणूक प्रमुख संजय भेंडे ग्रामीणचे माजी अध्यक्ष डॉ राजीव पोतदार,अशोक धोटे,मल्लिकार्जुन रेड्डी किशोर रेवतकर यांच्या उपस्थितीत नागपूर ग्रामीणचे भाजपा जनप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ग्रामीणमधील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विधानसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे.
पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र: अनिल निदान, रमेशराव चिकटे,विशाल चामट,दिलीप माथनकर, राजीव पारवे, निखिल येळणे, वीरू जामगडे, प्रमोद घरडे, पियुष बुरडे व विजय हटवार.
पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्र: अशोक धोटे विजयकुमार देवगडे, संजय टेकाडे, एड प्रकाश टेकाडे, प्रमोद गमे, राजेश ठाकरे, प्रसन्ना तिडके, राजेंद्र शेंद्रे, किशोर चौधरी व अजय अग्रवाल.
उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्र: सुरेंद्र शेंडे,कुलभूषण नवधिंगे,राजेश रंगारी,मंगेश यादव,नरेंद्र धानोले,मोहन माकडे,राजकिरण बर्वे,पंकज साबळे,मनोज चवरे, ज्योती कोल्हेपरा,रामराव मोवाडे, धनराज देवके, सुजित नितनवरे व नरेश चरडे.
दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र: रूपचंद कडू,टेकचंद सावरकर,अविनाश खडककर, इमेश्वरराव यावलकर, सतीश शाहकार, भोजराज घोडमारे, चंद्रशेखर राऊत, उकेश चौहाण, मंदार मंगळे, चंद्रशेखर राऊत व सुनील कोडे.
मध्य नागपूर विधानसभा क्षेत्र: रोहित कारू, राहुल किरपान, वींद्र गायधने, नरेश मोटघरे, सुधीर पारवे व चेतन खडसे आणि
दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्र: राजेश गौतम, योगेश चाफले,अंबादास उके,विशाल भोसले, मनोहर कुंभारे, मनोज कोरडे, उज्वलाताई बोढारे, शैलेंद्र मिसाळ, संध्याताई गोतमारे व आदर्श पटले यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व ६१ पदाधिकारी व कार्यकर्ते शहरात पूर्ण वेळ थांबून १५ तारखेपर्यंत प्रचारात सहभागी होऊन प्रचाराला गती देतील असे नियोजन करण्यात आले आहे.