काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला एका वाहनाने जोरदार धडक दिली Pudhari
नागपूर

Prashant Padole Car Accident | भंडारा - नागरपूर महामार्गावर काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला ट्रकची धडक

Nagpur News | याच रस्त्यावर तिसऱ्यांदा अशाप्रकारचा डॉ. पडोळे यांच्या वाहनाचा अपघात

पुढारी वृत्तसेवा

Bhandara Nagpur Highway Accident

नागपूर : भंडारा येथील काँग्रेसचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला सोमवारी (दि.३०) सकाळी एका वाहनाने जोरदार धडक दिली. कारच्या पुढील भागात ही जोरदार धडक बसल्याने कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने डॉ. पडोळे हे थोडक्यात बचावले.

आज सकाळी भंडारावरून नागरपूरला जात असताना त्यांच्या वाहनाला ट्रकने जोरदार धडक दिली. यात ते थोडक्यात बचावले. खासदार डॉ.पडोळे अधिवेशनाकरिता दिल्ली साठी निघाले होते.

विशेष म्हणजे याच रस्त्यावर तिसऱ्यांदा अशाप्रकारचा त्यांच्या वाहनाला अपघात घडला आहे. आता हल्दीराम समोर नागपूरजवळ हा अपघात घडल्याने यासंदर्भात शंका व्यक्त केली जात आहे. लगेच दुसऱ्या वाहनाने डॉ. पडोळे हे नागपूरला आणि नंतर विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT