महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (File Photo)
नागपूर

Bawankule Criticism Congress | जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची रोजी रोटी चालावी यासाठी अशा यात्रा !

काँग्रेसकडे सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून यात्रा : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे टिकास्‍त्र

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - आता त्यांच्याकडे काही काम शिल्लक नाही.65 वर्ष त्यांनी काय केलं सांगता येत नाही. जनतेमध्ये संभ्रम तयार करून राजकारणाची रोजी रोटी चालावी यासाठी अशा यात्रा निघतात असे टीकास्त्र महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेत्यांवर सोडले.

सरकार बदललं की मंत्री बदलतात पण ओएसडी आणि पीएस बदलत नाही. सरकार बदलते तेव्हा त्या सरकारच्या अजेंडावर काम करणारे त्या ठिकाणी अधिकारी आले पाहिजे. जुने जे वीस- वीस वर्ष एकाच ठिकाणी जागावर बसले आहे.. त्यांनी फिल्डवरही काम केले पाहिजे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या देखील दोन दोन वर्षांमध्ये बदल्या होतात. मुख्यमंत्र्यांची एवढीच भावना आहे की मंत्रालयीन कॅडरमध्ये जी वेगवेगळे लोक बसली आहे त्या लोकांनाही वेगवेगळे काम यायला पाहिजे.

जिल्हाध्यक्ष निवडीत कुठलीही नाराजी नाही आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्या जिल्हाध्यक्षांच्या निवड झालेल्या आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या कोर ग्रुप ला विश्वासात घेऊन झाल्या आहेत एका जागेसाठी चार इच्छुक असतात. त्यामुळे नाराजी दिसते. ज्यांची नाराजी आहे त्यांना कुठल्या ना कुठल्या मंडळामध्ये सामावून घेणार आहे.

पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना जे जे वचन घोषणा 2014 मध्ये 2019 च्या निवडणुकांमध्ये आणि 2024 च्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांकरता ती संकल्पना, जाहीरनामा आमचे सरकार पूर्ण करत आहे. काँग्रेस 65 वर्षाच्या काळामध्ये जे करू शकले नाही ते सर्व विषय आमचे डबल इंजिन सरकार मार्गी लावत आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना अंतर्गत त्या ठिकाणी केंद्र सरकार योजनेच्या त्याना 12 हजार रुपये त्याचा निर्णय घेतला आहे.

स्वतः घोटाळे केले, आता राजीनामा मागतात

एकनाथ शिंदे राजीनामा संदर्भात बोलताना हे घोटाळेबाज लोकं राजीनामा मागत आहेत. तेच घोटाळेबाज लोक आहेत. उद्धव ठाकरे संपुर्ण सरकार घोटाळेबाज होते.त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सगळेच घोटाळेबाज होते. एकनाथ शिंदे इमानदारीने काम करत आहेत. असेही बावनकुळे म्‍हणाले.

उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये लोक घोटाळे करीत होते त्याची माहिती एकनाथ शिंदे आणि अजित दादांनी उद्धव ठाकरेंना अनेकदा दिली त्यांनी काही केलं नाही. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे मिळून घोटाळे करत होते सरकारचे नाव खराब करत होते.करोना सारख्या काळामध्ये त्यांनी पैसा खाल्ला.

दुसऱ्यांवरती आरोप लावायचा त्यांना काय अधिकार आहे. दरम्यान,माओवाद्यांचा बंद संदर्भात अमित शहा यांनी नक्षलवाद मोडून काढण्याचा संकल्प केला आहे. आमच्या देशाचे गृहमंत्री एक कणखर आहेत अशा कुठल्याही धमक्यांना आम्ही भीक देणार नाही असा दावा केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT