नागपूर : पुरोगामी विचाराचे असले तरी शरद पवार जे खरे आहे तेच बोलतात. यामुळेच त्यांनी संघाच्या कार्याचे कौतुक केले. शरद पवार यांनी आमच्यासोबत यावे हे सगळ्यांचे मत आहे. त्यामुळे पक्ष मजबूत होईल. महाराष्ट्रात आणि दिल्लीतही ताकद वाढेल अशी भूमिका माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गुरुवारी व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणूक संदर्भात संघ प्रचारकांचे कौतुक केले याचे राष्ट्रवादी अजित पवार गटात स्वागत होत आहे.
पवार साहेब बोलले तर खरेच आहे. निवडणूकीत संघामुळे भरीव मतदान झालं, म्हणुन मोठ्या प्रमाणात भाजप महायुती उमेदवार निवडून आले. शरद पवार महायुतीत आले तर चांगलेच होईल, मात्र अजून बैठक झाली नाही. तूर्त शरद पवार आमच्या महायुतीला सपोर्ट करतील असे वाटत नाही. यासोबतच काही खासदाराना ऑफर दिली असेही खरे वाटत नाही.
मतापरिवर्तन होऊन ते आमच्याकडे आलेच तर विकासकामे करण्यासाठीं फायदाच होईल, केंद्राचा निधी मिळेल, सत्तेत आल्यास फायदा होईल. खासदार असून विरोधात राहून नाही तर सत्तेत राहिलो तर फायदा होइल. प्रफुल पटेल यांना मंत्रिपद देतो असे मागेच बोलले होते, पण त्यावेळी तसे झाले नाही याकडे लक्ष वेधले.
दरम्यान, शरद पवार, अजित पवार एकत्र आल्यास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि देशात एक प्रकारची क्रांती होईल. राजकारणात राजी- नाराजी चालतच राहते. जन्मदिवसाच्या दिवशी त्यांनी भेट घेतली. अजितदादाच्या आईने सुद्धा यात साखर घातली. खासदार आणि आमदार विरोधात राहून विकास होत नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस गडचिरोलीचे पालकमंत्री व्हावेत अशी माझी इच्छा आहे. सूरजागड झपाट्याने पुढे जाईल. ते पूर्वी मुख्यमंत्री असतांना त्यांनी भूमीपूजन केले. आता तेच पालकमंत्री झाल्यास मानयनिंग हब होण्यास फायदा होईल. यासाठी स्वतंत्र बॉडी तयार झाली पाहिजे असे मत आत्राम यांनी व्यक्त केले.