Chief Minister Majhi Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना  File Photo
नागपूर

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुटीच्या दिवशीही

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : राज्यात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज आज (दि. 13, शनिवार) आणि रविवारी (दि. 14) या सुटीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर असल्याने या योजनेचे कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी सुरु ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.

शनिवार, दि. 13 व रविवार दि. 14 जुलै रोजी शासकीय कार्यालये सुरु ठेवण्यात येत असल्यामुळे महिला लाभार्थी यांना या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशीही संबंधित मदत केंद्रावर अर्ज दाखल करता येणार आहेत. योजनेच्या सर्व महिला लाभार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT