Anil Deshmukh
अनिल देशमुख यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.  Pudhari File Photo
नागपूर

Anil Deshmukh On Devendra Fadanvis | खोटे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी फडणवीस यांचा माझ्यावर दबाव : अनिल देशमुख

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तीन वर्षापूर्वी खोटे प्रतिज्ञापत्र तयार करुन द्या, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी (दि.24) माध्यमांशी बोलताना केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळाच चांगलीच खळबळ माजलेली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी जर असे केले तर माझ्यावर कारवाई होणार नाही असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांच्या विश्वासातील व्यक्तीकडून दिले होते. असाही आरोप यावेळी बोलताना देशमुख यांनी केला.

श्याम मानव यांनी केलेले आरोप

  • श्याम मानव यांनी केलेल्या आरोपानुसार, पहिल्या प्रतिज्ञापत्रमध्ये, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावून तीनशे कोटी रुपये गोळा करायचा आदेश दिला.

  • दुसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियनवर बलात्कार करुन तिचा खून केला, असे लिहिलेले होते.

  • ठाकरेंच्या जवळचे अनिल परब यांच्यावरील गैरप्रकारांच्या आरोपांचा उल्लेख होता. यावर सही केली तर तुम्ही ईडी, सीबीआयपासून वाचाल असं तिसऱ्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटलं होतं.

  • चौथ्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांनी अनिल देशमुख देवगिरी बंगल्यावर बोलावले, त्यावेळी त्यांनी मला आदेश दिला की, सर्व गुटखावाल्यांकडून करोडो रुपये गोळा करा.. अशी ही चार प्रतिज्ञापत्रं होती. परंतु अनिल देशमुखांनी सही केली नाही आणि स्वतः तेरा महिने जेलमध्ये गेले, असं श्याम मानव म्हणाले होते.

अंनिसचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांनीही यासंदर्भात आरोप केले आहेत. देशमुख यांनी मानव जे बोलले ते खरे असल्याचे सांगत स्पष्ट केले की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. तेव्हा मी गृहमंत्री होतो, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना माझ्यावर शंभर कोटींचा खोटा आरोप करायला लावला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस माझ्याकडे पाठवला. त्याने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. त्यानंतर अनेकदा तो माझ्याकडे आला. प्रत्येक वेळी त्या व्यक्तीने माझे आणि फडणवीस यांचे फोनवरून बोलणे करून दिले. असेही देशमुखांनी यावेळी सांगितले.

अर्थातच देशमुख यांनी आपल्याकडे पुरावे वेळ आल्यावर ते उघड करील असे सांगितले, फडणवीस यांनीही मी योग्य वेळी ते ऑडिओ, व्हिज्युअल सार्वत्रिक प्रसिद्ध करु असा इशारा दिला. मात्र,देशमुख -फडणवीस असे बोलणे करून देणारी व्यक्ती कोण ? हे अजून गुलदस्त्यात आहे.

SCROLL FOR NEXT