माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रुग्णालयात जखमींची विचारपूस केली  
नागपूर

Anil Deshmukh | स्फोटके कंपनीच्या सेफ्टी ऑडिटकडे दुर्लक्ष भोवले, अनिल देशमुख यांचा आरोप

सहा महिन्यांपुर्वीच केला होता पत्र व्यवहार,

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - नागपूर जिल्ह्यात बाजारगाव परिसरात असलेल्या सर्वच स्फोटके तयार करणाऱ्या कंपनीमध्ये वारंवार होत असलेले स्फोट, कामगारांचा मृत्यू ही गंभीर बाब असून या परीसरातील सर्वच स्फोटके कंपनीचे सेफटी ऑडीटकडे होणारे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याचा आरोप माजी गृहमंत्री करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

आपण स्वतः मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ,पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना व संबधित विभागाकडे पत्र लिहून याविषयीची मागणी केली होती. परंतु याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केल्याने परत आज एक मोठी दुघटना घडली. 17 कामगाराचा जीव गेला,अनेक गंभीर आहेत. वेळीच जर सेफ्टी ऑडिट केले असते तर आजची घटना टाळता आली असती असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.

पुन्हा एकदा नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राउलगाव येथील एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटके निर्माण करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन १७ कामगारांचा बळी गेला तर १८ हून अधिक कामगार गंभीररित्या जखमी झाले. ही घटना अत्यंत दुःखद आणि धक्कादायक आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कामगार वर्गात आणि परिसरात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तथापि, राज्य आणि केंद्र सरकारने या गंभीर मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यालय नागपुरात असूनही दुर्लक्ष का?

पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटनेचे (PESO) देशातील मुख्य कार्यालय नागपुरातच आहे, तरीही नागपूरमध्ये स्फोटांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत ही गंभीर बाब असल्याचेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले. या कंपन्यांमध्ये स्फोटके अधिनियम, १८८४ आणि कारखाना अधिनियम, १९४८ नुसार सुरक्षा उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक आहे. परंतु, वारंवार होणाऱ्या दुर्घटनांमुळे असे दिसते की सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन होत आहे आणि संबंधित शासकीय यंत्रणा (PESO आणि DISH) आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत. आज घडलेल्या दुघटनेमध्ये मृत कामगारांना राज्य सराकारने 25 लाख रुपये तर कंपनीने 50 लाख रुपयाची मदत करावी. तसेच तातडीने बाजारगाव परिसरात असलेल्या सर्वच स्फोटके तयार करणाऱ्या कंपन्यांचे सेफटी ऑडीट करावे. ज्या स्फोटके कंपनी कामागारांच्या सुरक्षकडे दुर्लक्ष करीत असतील त्या कंपन्या बंद करा अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.

जखमींची केली विचारपुस

दरम्यान,अनिल देशमुख यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. तसेच कंपनी मालक यांच्यासोबत फोनवरुन चर्चा करुन मृतकांच्या नातेवाईकांना 50 लाख रुपयाची मदत करावी तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च करावा अशी मागणी केली.यानंतर त्यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारापूस करीत डॉक्टरांकडुन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच मृतकांच्या कुटुंबीयांची भेट घेवून त्यांचे सात्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT