नागपूर

बॉम्ब सदृश्य बॉक्समुळे नागपूरमध्ये खळबळ; अग्निशमन यंत्र असल्याच्या माहितीनंतर नागरिकांना दिलासा

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकात उभ्या बसमध्ये बॉम्ब सदृश्य बॉक्स आढळल्याने बुधवारी दुपारी खळबळ उडाली. मात्र ही वस्तू बॉम्ब नव्हे तर अग्निशमन यंत्र असल्याची माहिती समोर आल्याने नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. हे यंत्र रेडमॅटिक कंपनी निर्मित अग्निशमन उपकरण आहे.

दुरुस्तीसाठी आलेल्या गडचिरोली डेपोच्या बसमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू असल्याची माहिती गणेशपेठ पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाला देण्यात आली. बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठत बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत त्या संशयास्पद वस्तूला सुराबर्डी येथे निकामी करण्यासाठी नेण्यात आले होते. मात्र तपासात अग्निशमन उपकरण असल्याचे समोर आले.

गडचिरोली येथून एमएच 40 वाय 5097 या क्रमांकाची ही बस 1 फेब्रुवारीला गणेशपेठ स्थानकात रात्री आली. दुसऱ्या दिवशी गाडीचे काम निघाल्याने ही गाडी गणेशपेठ आगारात उभी होती यानंतर ही गाडी सावनेरला देखील गेली. आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास ती गणेशपेठ बस स्थानकात आली. आगारात एका कर्मचाऱ्याला या बसमध्ये संशयास्पद एक टिफिनच्या आकाराची वस्तु आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली

SCROLL FOR NEXT