Crime News pudhari photo
नागपूर

Nagpur Crime : फरार आरोपीचा पोलिसांच्या ताब्यात असताना विषप्राशनाने मृत्यू

५ लाखांच्या अपहार प्रकरणातील कारवाईदरम्यान घडला प्रकार

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील पेट्रोल पंपावरील ५ लाखांचा अपहार करणाऱ्या एका फरार आरोपीचा नागपुरात हुड़केश्वर पोलिसांच्या ताब्यात असताना विष घेऊन मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. अमित भगत (वय ३०, रा. कळंब,जी.यवतमाळ) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे हे उंदीर मारण्याचे औषध आले कसे? हे देखील कोडेच आहे. त्याने सुरुवातीला पोलिसांना आपण गुटखा खाल्ल्याने तब्येत बिघडल्याचे सांगितल्याची माहिती आहे.

हुडकेश्वरच्या हद्दीत राहत असलेल्या आरोपीला पकडायला कळंब- यवतमाळवरून पोलिसांचे पथक आले होते. त्यावेळी तो घरी नव्हता. अखेर पोलिसांनी त्याच्या बायकोला ताब्यात घेतले. तिच्याकडून माहिती घेतल्यानंतर तो स्थानिक एका पेट्रोल पंपवर व्यवस्थापक म्हणून काम करतो, म्हणून पोलिस त्याला ताब्यात घेण्यास गेले. मात्र, तिथेच त्याने काही विषारी औषध घेतले. लागलीच यवतमाळ पोलिसांनी त्याला पकडून हुडकेश्वर पोलिस स्टेशनला आणले मात्र, त्याची प्रकृती खालावली. त्याला तातडीने शासकीय मेडिकल रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT