nagpur Accident
मोबाईलवर बोलत महिला कारचालकाने तीन दुचाकींना उडविले FILE PHOTO
नागपूर

नागपूर : मोबाईलवर बोलत महिला कारचालकाने तीन दुचाकींना उडविले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : गिट्टीखदान येथे एका महिलेने मोबाईलवर बोलत गाडी चालवत असताना तीन दुचाकी उडवल्याची घटना गुरुवारी (दि.25) घडली. सुनिधी फ्रान्सीस (वय.32, रा. भूपेशनगर, नागपूर) असे या संशयित आरोपी महिला कारचालकाचे नाव आहे. या अपघातात दोन दुचाकी चालकांसह भाजीविक्रेता जखमी झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गिट्टीखदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामविलास गुप्ता यांचे गिट्टीखदान चौकात फुटपाथवर भाजीविक्रीचे दुकान आहे. गुरुवारी (दि.25) ग्राहकांशी बोलत भाजीविक्री करत असताना एमएच 31 एफयु 1821 क्रमांकाची कार तीन वाहनांना उडवित त्यांच्या भाजीपाला दुकानाला धडक देऊन झाडावर आदळली. संशयित आरोपी कारचालक सुनिधी फ्रान्सीस या कार चालवित असताना त्यांच्या एका हातात मोबाईल होता तर दुसऱ्या हातात कारचे स्टेअरिंग होते. अनियंत्रित कार सांभाळण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात घडला. कारचे,दुचाकींचे नुकसान झाले असले तरी मोठा अनर्थ टळला.

SCROLL FOR NEXT