Laborer killed in Nagpur
नागपुरात जेवण बनवण्याच्या वादातून एका मजुराचा खून करण्यात आला. Pudhari News network
नागपूर

नागपुरात जेवण बनवण्याच्या वादातून मजुराचा खून

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : जेवणात चिकन की फिश अर्थात मासोळी हा खरेतर वादाचा विषय होऊ शकतो का, मात्र हल्ली कधी काय होईल? काहीही सांगता नाही. तीन मजुरांनी याच वादात एका मजुराचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिहान सिटीजवळ घडली. लंबू उर्फ शिवम असे खून झालेल्या मजूराचे नाव आहे. याप्रकरणी जितेंद्र बाळाराम रावते (वय ३५, रा. राजनांदगाव, छत्तीसगड), अखिलेश धोंडीलाल सहारे (वय २८, रा. शिवनी मध्य प्रदेश) आणि दीपक अशी संशयितांची नावे असून याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

लंबू हा मध्य प्रदेशातील रहिवासी होता. काही महिन्यापूर्वीच तो नागपुरात मजुरीसाठी आला. मिहान सिटी परिसरातील सूर्या रेसिडेन्सी येथे बांधकाम मजूर म्हणून हे सर्वजण काम करीत होते. याच ठिकाणी या चौघा प्रांतातून आलेल्या मजुरांची भेट झाली. मेट्रो स्टेशनच्या परिसरातच ते राहत होते. बुधवारी सायंकाळी या चौघांना काम मिळाल्याने ते आनंदात असल्याने सारे दारू प्यायले. शेवटी जेवण काय करायचे यावरून झालेल्या चर्चेत चिकन की मासोळी असा वाद झाला आणि तो वाद विकोपाला गेला. लंबूने मासोळीचा आग्रह धरला तर इतरांना चिकन हवे होते. दारूच्या नशेत तिघांनी लंबूला मारहाण केली, डोके दगडाने ठेचले. यात त्याचा मृत्यू झाला. दोघांना तातडीने पोलिसांनी अटक केली. तिसरा आरोपी दीपक अजून फरार आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

SCROLL FOR NEXT