नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण विकास व पर्यटनाला गती देण्यासाठी 84.27 कोटींचा निधी मिळाला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मागणीवरून ग्रामविकास पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत ४० किमीचे तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-३ अंतर्गत ५० किमी रस्त्यांच्या बांधकामासाठी प्रशासकीय मान्यता दिली.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या विकासालाही मान्यता देण्यात आली. यात मु्ख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याच्या कामासाठी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र, स्वामी रामदास जांबसमर्थ मंदिर / राममंदिर देवस्थान, जांबसमर्थ ता. घनसावंगी, श्री संत सखुआई पंचकमेटी देवस्थान, श्रीक्षेत्र नारायण धाम, पळसगाव (बाई) ता.सेलु, जि. वर्धा येथील विकासासाठी हा निधी मिळाला असून याविषयीचे आदेश ग्रामविकास पंचायतराज व पर्यटन मंत्रालयाने काढले आहेत.