नागपूर रेती तस्करांचे ८ ट्रक जप्त करण्यात आले. File Photo
नागपूर

नागपूर रेती तस्करांचे ८ ट्रक जप्त; २६ लाखांचा दंड

Sand mining : रेती माफियांमध्ये खळबळ

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : रामटेक उपविभागीय अधिकारी आणि देवलापार पोलिसांनी वाळू तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. वाळू भरलेले ८ ट्रक जप्त केले असून २६ लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर जिल्ह्यातील वाळू तस्करांमध्ये खळबळ माजली आहे.

महसूल विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दोन पथकाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. हे सर्व ट्रक नागपूर ग्रामीणमध्ये रामटेक तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून महसूल अधिकारी पुढील कारवाई करीत आहेत. गेल्या अनेक दिवसात रेती तस्कराविरोधात कारवाईचे संकेत राज्य सरकार व प्रशासनाच्या वतीने दिले जात असताना ही मोठी कारवाई मानली जात आहे. यापुढेही अशाच पद्धतीने कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महसूल विभागाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT