नागपूर

नागपूरचा 6 वर्षीय वंडर बॉय; अनिश खेडकर रमला स्पेस सायन्समध्ये!

Shambhuraj Pachindre

[author title="राजेंद्र उट्टलवार" image="http://"][/author]

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : खरेतर कुणालाही फार-फार तर चार, पाच विषयाची इत्यंभूत माहिती असेल. पण, नागपूरचा वंडरबॉय किंबहूना "गुगल बॉय" म्हणून ओळख झालेला सहा वर्षीय अनिश अनुपम खेडकर या चिमुकल्याने स्पेस सायन्स, रॉकेट, जेटफ्लाईट,हेलिकॉप्टर इतकेच नव्हे तर जगातील अनेक देशांचे चलनासह अनेक विषयांचे सखोल ज्ञान अर्जित केले आहे. त्याला दोन हजार प्रश्नांची उत्तरे तोंडपाठ आहेत.

अनिशला अंतरिक्ष व अंतराळवीरांच्या बाबतीत सर्वाधीक रस आहे. त्यामुळे त्याला स्पेसच्या संदर्भातील पाचशे तत्थ (फॅक्ट्स) माहिती आहे. अनिशच्या नेत्रदीपक यशामागे त्याची आई स्मिता यांचे विशेष योगदान आहे. स्मिता यांनी कर्करोगाशी लढत असतानाच अनिशवर केलेल्या संस्कारामुळे तो अवघ्या सहाव्या वर्षी गुगल बॉय म्हणून नावारूपाला आला आहे. अनिश अवघ्या २ वर्षांचा होता तेव्हा तो नागपुरला आजीकडे राहायला आला.

अनिशचे वडील अनुपम यांना नोकरीच्या निमित्ताने वारंवार बाहेर रहावे लागत असल्यामुळे अनिशची आई कल्याणी खेडकर काही काळासाठी आईकडे नागपूरला राहायला आल्या. अनिश चालायला व बोलायला शिकत असताना तो अंतराळच्या चित्रांमध्ये रमायचा. अर्थातच अवघ्या दोन वर्षांच्या अबोल बालकाची स्पेसमधील रुची ही थक्क करणारी होती. इथून अनिशच्या असाधारण बुद्धीमत्तेला आकार देण्याचा खऱ्या अर्थी प्रवास सुरु झाला.

अनिशला सर्वाधिक रस हा स्पेस सायन्समध्ये आहे. त्याला अंतराळाशी संबंधित ५०० तथ्ये माहिती आहेत. त्याला जगातील १९५ देशांची राजधानी ठाऊक आहे. याशिवाय नकाशावर देखील कोणता देश कुठे आहे व कोणत्या खंडात आहे, याची इत्यंभूत माहिती अनिशकडे आहे. १९५ देशाचे ध्वज तो अचूक ओळखतो. जागतिक ५० स्मारकांची त्याला माहिती आहे.

भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधानीबद्दल तर विचारायलाचं नको, १५० कारचे लोगोही तो ओळखतो. जागतिक चलनाच्या बाबतीतील त्याचे ज्ञान तर थक्क करणारे आहे. याशिवाय मंगळयान, चंद्रयान, गगनयान, आदित्य L1 बद्दल त्याच्याकडे अफाट माहिती आहे. अनिशची आई कल्याणी आणि आजी स्मिता पंडित यांनी अनिशला घडवले. रोज नवनवीन माहिती आणि प्रयोग स्मिता पंडित यांच्या घरी होऊ लागलेत. बघता-बघता अनिश अनेक विषयांमध्ये पारंगत होऊ लागला. सर्वकाही सुरळीत सुरू असताना अचानक स्मिता पंडित यांना कर्करोगाचे निदान झाले. एकीकडे उपचार, किमो थेरपीचा असह्य होणारा त्रास सहन करत त्यांनी अनिशच्या आजीने त्याच्या अभ्यासात कधीही खंड पडू दिलेला नाही.

अनिशवर झाले गर्भ संस्कार

कल्याणी खेडकर या गर्भवती असताना त्यांनी स्पेस सायन्स, आंतरराष्ट्रीय घडामोडी, संस्कृती, शैक्षणिक यासह अनेक विषयांचे वाचन आणि अभ्यास केला आहे. त्याचा सकारात्मक परिणाम आज अनिशवर दिसतो यामुळेच गर्भ संस्कार हे फार महत्वाचे असल्याचे वडील सांगतात.

SCROLL FOR NEXT