4 flights from Nagpur to Delhi, Mumbai, Bangalore canceled
नागपूरवरून दिल्ली, मुंबई, बंगलोरला जाणारी ४ विमाने रद्द File Photo
नागपूर

नागपूरवरून दिल्ली, मुंबई, बंगळुरूला जाणारी ४ विमाने रद्द

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्‍तसेवा

मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा आज (शुक्रवार) जगभरात बँकिंग, हवाइसेवा, दळणवळण क्षेत्राला मोठा फटका बसला. याचाच फटका नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला देखील बसला आहे. एकाचवेळी चार विमाने रद्द करण्यात आल्याची माहिती विमानतळावर देण्यात आली आहे.

डिस्प्ले बोर्ड बंद झाले असून सुरक्षात्मक तपासणीच्या ठिकाणी देखील यंत्रणा ठप्प झाली आहे. नागपुरातून दिल्लीच्या दिशेने जाणारी दोन तर नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते बंगळुरू अशी चार विमाने रद्द करण्यात आली आहेत. यामुळे सुमारे सातशेच्यावर प्रवाशांना याचा फटका बसल्याची माहिती विमानतळ सूत्रांनी दिली.

अर्थातच हा तांत्रिक दोष लवकर दूर न झाल्यास यापेक्षा अधिक हवाई प्रवाशांना त्याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासोबतच नागपुरातील बँकिंग क्षेत्रातही आज मोठ्या प्रमाणात व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसले. ऑनलाईन प्रमाणपत्र व इतर कामेही खोळंबली आहेत.

SCROLL FOR NEXT