नागपूर

नागपुरातील महानगरपालिकेच्या १० मराठी शाळा बंद होणार

दिनेश चोरगे

नागपूर;पुढारी वृत्तसेवा: राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद, अनुदानित मराठी शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे. यंदा महानगरपालिकेच्या १० मराठी शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्याने शासन नियमानुसार या शाळा बंद होणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकीकडे मराठी माध्यमांच्या शाळा पटसंख्येमुळे बंद होणार असताना मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मात्र पालक पसंती देत असल्याचे समाधानकारक चित्र आहे.

नागपूर शहरात महापालिकेच्या १५७ शाळा होत्या. ती संख्या आता ११७ वर आली आहे. मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमातील शाळा एकापाठोपाठ एक बंद पडत आहेत. शाळेत कमी होत असलेली पटसंख्या असो की इतर कारणे असोत, गरीबांच्या हक्काची शाळा बंद होत असेल तर मग प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या शिक्षणाचा अधिकार कसा मिळेल? हा प्रश्न उपस्थित होत आहे. खासगी संस्थेत इंग्रजी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी चढाओढ आपण नेहमीच पाहतो. मात्र, महानगरपालिकेच्या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी होणारी गर्दी राज्यात फक्त नागपुरमधील मनपाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेत पहायला मिळत आहे़.

माध्यमानुसार       मनपा शाळांची पटसंख्या

मराठी                           ३१ १९८५
हिंदी                             ४४४१६३
उर्दू                              १८२७१२
इंग्रजी                           ७२५१४

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT