विदर्भ

नागपूर: वाडी नगरपरिषदेत मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड

अविनाश सुतार

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील वाडी नगरपरिषदेत आज (दि.१७) मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड केली. चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची महिती आहे.

शहरात शासकीय रुग्णालय बांधण्याची मागणी, शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, वाडी क्षेत्रातील होणाऱ्या पाण्याची टंचाई विरोधात नगरपरिषदेला वारंवार निवेदन देऊनही कुठलीच कार्यवाही न करता नगर परिषदेचे मुख्याधिकारी देशमुख मनमानी पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला.

या विरोधात नगरपरिषद कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी कार्यालयात खुर्च्यांची तोडफोड केली. सामान्य माणसाच्या समस्या सुटणार नसतील. तर कार्यालय आणि खुर्च्यांची गरज नसल्याचे मन सैनिकांनी सांगितले. प्रशासनाने दिलेल्या तक्रारीनंतर आंदोलनकर्त्या मनसैनिकांविरूध्द वाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT