नागपूर: पुढारी वृत्तसेवा : नागपुरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या गारपीट, वादळी पावसाने गोंडवाना चौकातील जेपी हाइट्सची भिंत आणि दोन झाडे घरावर कोसळली. या दुर्घटनेत मायलेक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
मलब्यात दबलेल्या दोघांना काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ज्योती अशोक यादव, अमन यादव असे मृतांची नाव आहेत. दोन झाडे कोसळल्याने भिंत घरावर पडली. सुदैवाने लहान मुलगा आणि पिता अशोक यादव बाहेर गेल्याने बचावले. त्यांची पान टपरी आहे. रात्री ते आल्यावर सर्व उलगडा झाला. सदर पोलीस, अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. ठिकठिकाणी झाडे कापण्याचे वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम आजही दिवसभर सुरू होते. आज सकाळी देखील अनेक भागात वीज नसल्याने महावितरण कार्यालयावर नागरिकांनी धाव घेत संताप व्यक्त केला.
हेही वाचा