विदर्भ

नागपूर : भरती घोटाळाप्रकरणी पैसे घेताना तिघे अडकले सीबीआयच्या जाळ्यात

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भरती घोटाळ्यांतर्गत 2 लाख रुपये घेताना सीबीआयने कामठी कॅन्टोन्मेंट येथील एका सफाई कर्मचाऱ्यांसह तीन जणांना अटक केली. या आरोपींना 21 तारखेपर्यं कोठडी सुनावली आहे. याशिवाय एका अज्ञात अधिकाऱ्यांसह चार जणांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याने या प्रकरणी गोपनीयता पाळली जात आहे. संरक्षण मंत्रालय जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या मते यात कन्टोमेंटमधील कुणाचा सहभाग नाही. सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड (KCB), नागपूर (महाराष्ट्र); भरतीशी संबंधित लाचखोरी प्रकरणात एक उमेदवार (माळी पदासाठी निवडलेला) आणि कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड, शाळा, नागपूर येथे कंत्राटी तत्त्वावर काम करणारा एक नर्सरी शिक्षक, एक सफाई कर्मचारी यात गुंतले आहेत. तसेच केसीबीचे माजी उपाध्यक्ष, सार्वजनिक सेवक हे खाजगी व्यक्तींच्या संगनमताने भरतीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. माळी या पदासाठी निवडलेला एक उमेदवार आणि केसीबीचे अज्ञात अधिकारी मोठ्या लाचेच्या बदल्यात सहाय्यक शिक्षक, माळी व सफाई कर्मचारी या पदाच्या भरतीमध्ये उमेदवारांशी संपर्क साधून त्यांना नोकरी देण्याचे आश्वासन देत होते. सहाय्यक शिक्षक पदासाठी बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या यादीत ज्या पात्र उमेदवारांची नावे आली आहेत अशा पात्र उमेदवारांशी संपर्क साधण्यासाठी माजी उपाध्यक्ष नियमितपणे सदर सफाई कर्मचाऱ्यांशी संपर्क साधत असल्याचा आरोप आहे. केसीबीमध्ये माळी या पदावर निवड झाल्यानंतर उमेदवाराने सफाई कर्मचाऱ्याकडे सुररुवातील 50 हजार रुपये आणि उर्वरित 11.50 लाख रुपये नंतर देण्याचे मान्य केले.

सीबीआयने सापळा रचून सदर सफाई कर्मचार्‍याला ही 2 लाख रुपये रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. तपासादरम्यान, केसीबी स्कूल, नागपूरमध्ये संपर्क तत्त्वावर काम करणाऱ्या नर्सरी शिक्षिकेची भूमिका उघडकीस आली आणि तिलाही पकडण्यात आले. आरोपी आणि इतरांच्या अधिकृत आणि निवासी जागेवर झडती घेण्यात आली ज्यामुळे कागदपत्रे जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना आज विशेष न्यायाधीश, सीबीआय केसेस, नागपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्यामध्ये दीप रमेश सकटेल, सफाई कर्मचारी, चंद्रशेखर कुवरलाल चिधलोरे, माळी या पदासाठी निवडलेले उमेदवार आणि श्रीमती. शीतल रामटेके कॅन्टोन्मेंट बोर्ड, शाळा नर्सरी शिक्षिका यांचा तर दीप रमेश सक्तेल, चंद्रशेखर कृष्णाजी लांजेवार उर्फ चंदू, माजी उपाध्यक्ष, कामठी कॅन्टोन्मेंट बोर्ड, चंद्रशेखर कुवरलाल चिधलोरे, (माळी या पदासाठी निवडले गेलेले उमेदवार) आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड अज्ञात अधिकारी या चौघांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT