File Photo 
विदर्भ

नागपूर : हॉटेल प्राईडच्या तलावात एकाचा संशयास्पद मृत्यू

backup backup

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : वर्धा रोडवर विमानतळाजवळ असलेल्या हॉटेल प्राइडच्या स्विमिंग पूलमध्ये रोज पोहण्यासाठी येत असलेल्या एका इसमाचा आज अचानक भोवळ आल्यानंतर मृत्यू झाला.

सुशांत मधुसूदन धोपटे (वय 51 वर्षे) असे मृतकाचे नाव असून ते मनीशनगर मेघर लेआऊट येथील रहिवासी आहेत. हा घातपात तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. शौर्य (12) व शगुण (17) या दोन मुलांसोबत रोजच या ठिकाणी ते पोहण्याचा सराव करण्यासाठी येत होते अशी माहिती मिळाली. आजही हे तिघे नेहमी प्रमाणे पोहण्यासाठी आले. मात्र त्यांना भोवळ आल्याने अस्वस्थ वाटू लागले. लागलीच त्यांना धंतोली येथील अवंती हॉस्पिटलला नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मधुसूदन धोपटे (79) यांच्या तक्रारीनुसार सोनेगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT