विदर्भ

नागपूर : आगामी निवडणूक संबंधी संघ-भाजपची २० एप्रिलला बैठक       

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी किमान ४० जागा आणि २०० विधानसभा मतदारसंघातील विजय भाजपाने गांभीर्याने घेतला आहे. यासंदर्भात संघ मुख्यालयी नागपुरात सातत्याने बैठकांचे सत्र सुरू आहे. येत्या २० एप्रिल रोजी नागपूरमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २० एप्रिल  रोजी नागपुरातील खामला अत्रे लेआऊट परिसरातील आमदार समीर मेघे यांच्या कॉलेजमध्ये भाजप खासदार, आमदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे आहे.  या बैठकीत आगामी मनपा, विधानसभा, लोकसभा अशा विविध निवडणुकांच्या दृष्टीने विचार मंथन केले जाणार आहे. संघ मुख्यालया सोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा गृह जिल्हा असल्याने  संघटनात्मक  नागपूरचे महत्त्व वाढले आहे. मे महिन्यातच नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्ग देखील आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्ताने ही भाजप- संघ शीर्षस्थ मंडळींमध्ये सतत बैठका होणार आहेत.

SCROLL FOR NEXT