विदर्भ

नागपूर : रांचीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाचा मृत्यू

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबईवरून रांचीला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आज रात्री नागपूरला इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने हे मेडिकल इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. मात्र, त्या प्रवाशाचा मृत्यू झाला. देवानंद तिवारी वय 62 वर्षे असे या प्रवाशाचे नाव असून या प्रवाशाला हवाई प्रवासादरम्यान रक्ताची उलटी झाली.

त्याला सीकेडी, टीबी व इतर आजार होते. प्रकृती अधिक बिघडल्याने वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. अखेरीस हे विमान नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्यात आले. त्यानंतर तातडीने या रुग्णाला किंग्सवे हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्सने मेडिकल कॉलेज रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT