file photo 
विदर्भ

नागपूर : आयकर विभाग भरती घोटाळा, 9 अधिकाऱ्यांना अटक; नऊ वर्षानंतर प्रकरण उघडकीस

backup backup

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : तब्बल ९ वर्षांनंतर उघडकीस आलेल्या आयकर विभागातील भरती घोटाळा संदर्भात सीबीआयने ९ अधिकाऱ्यांना अटक केली आहे. हे सर्व अधिकारी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या २०१२-१४ दरम्यान झालेल्या परीक्षांमधून भरती झाले होते. या घटनेमुळे अधिकारी आणि परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २०१२ , २०१४ मध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे प्राप्तिकर विभागासाठी ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत १२ विद्यार्थ्यांनी डमी उमदेवार म्हणून बसविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाची कसून तपासणी सुरू करीत सर्व पुरावे गोळा केले.

सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये स्टेनोग्राफर रिंकी यादव, सरिता, अनिल कुमार, राहुल कुमार, अभय कुमार, मुकेश कुमार, चंदन कुमार, मनोज कुमार, प्रदीप कुमार, मनीष कुमार आणि धर्मेंद्र कुमार यांचा समावेश आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून या ९ अधिकाऱ्यांची पोलीस उपायुक्त संदीप चौगले यांच्या नेतृत्वात चौकशी सुरु होती. चौकशी दरम्यान, हे ९ जण २०१२-२०१४ दरम्यानच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेत बसलेच नव्हते. डमी उमेदवारांना त्यांच्या जागेवर बसवण्यात आल्याचेही उघड झाले.

विशेष म्हणजे चौकशीदरम्यान, संबंधित उमेदवारांचे हस्ताक्षर, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे परीक्षेच्या वेळी आणि नोकरी कालावधीत वेगवेगळे आढळून आले. याच कागदपत्रांच्या आधारे या ९ अधिकाऱ्यांविरोधात आयपीसी कलम ४१६, ४१७, ४२०, ४६४ एल, ४६८ आणि ४७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्वांना अटक करण्यात आली. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या अधिकाऱ्यांना १६ डिसेंबरपर्यंतची कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT