file photo  
विदर्भ

नागपूर : वनदेवी नगर येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, गुन्हा दाखल

backup backup

नागपूर, पुढारी वृत्तसेवा :  बिनाकी विभागातील वनदेवीनगर परिसरात फ्यूजकॉलची तक्रार दुरुस्त करायला गेलेल्या महावितरणच्या कर्मचारी आणि शिडी वाहनावर गुरुवारी रात्री ९.३० च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि विटा फेकल्या. सुदैवाने यात महावितरण कर्मचारी थोडक्यात बचावले. सकाळी याच भागात वीजचोरी पकडण्यास गेलेल्या महावितरणच्या २ कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. या दोन्ही घटनाप्रकरणी यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिनाकी वितरण केंद्राचे कर्मचारी वनदेवीनगर झोपडपट्टीतील वीजचोरी पकडण्यात आणि वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांकडून बिल वसूल करण्यास गेले असता याच परिसरात राहणारा इलियास ए. रशीद वीजेच्या तारेला आकडा लावून घराला चोरीची वीज घेत असल्याचे आढळले. इलियासकडे महावितरणचे १८,७३० रुपये वीज बिल थकबाकी आहे. बिल न भरल्याने वीज पुरवठा कायमचा खंडित करून मीटरही जप्त करण्यात आले. महावितरणचा तंत्रज्ञ राहुल मोहाडीकर (३०) याने विजेच्या तारेवरील आकडा काढला आणि खाली उभा असलेला दुसरा कर्मचारी लखन चौरसिया याने वायर कापण्यास सुरुवात केली. कारवाईचे वेळी इलियासची पत्नी घरात हजर होती. महावितरणच्या या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी कर्मचाऱ्याकडील तार हिसकावून पुन्हा हुक लावण्याचा प्रयत्न केला, त्याला महावितरण कर्मचाऱ्यांनी विरोध केला.

महावितरणच्या कारवाईमुळे संतप्त झालेल्या दोघांनी राहुल मोहाडीकर यांना बेदम मारहाण केली. यावेळी मदतीसाठी धावलेल्या लखन चौरसियालाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यावेळी इतर कर्मचारी मारहाणीचा व्हिडिओ करत असताना कर्मचाऱ्यांना देखील धमकी देण्यात आली. मारहाण केल्यानंतर दोन्ही हल्लेखोर तेथून निघून गेले. याप्रकरणी महावितरणचे कर्मचारी राहुल मोहाडीकर यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT