विदर्भ

Bharatiya Janata Yuva Morcha : भाजयुमो प्रदेश कार्यकारिणीत, नागपूरचा वरचष्मा !

मोनिका क्षीरसागर

नागपूर:पुढारी वृत्तसेवा: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार महाराष्ट्रातून मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर देश व राज्य पातळीवर अनेक संघटनात्मक फेरबदल पक्ष मजबुतीच्या दृष्टीने केले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा भाजपा महामंत्री विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आता भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारणी घोषित करण्यात आली. दरम्यान यात नागपूरचा वरचष्मा दिसून आला आहे.

शिवानी दाणी वखरे
शिवानी दाणी वखरे
पारेंन्द्र (विक्की) पटले

या कार्यकारिणीमध्ये नागपुर शहरातून प्रदेश महामंत्रीपदी सलग दुसऱ्यांदा शिवानी दाणी वखरे यांची निवड करण्यात आली. तर भाजयुमो शहर अध्यक्ष म्हणुन जवाबदारी सांभाळणारे पारेंन्द्र (विक्की) पटले यांना प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आली. प्रदेश सचिव म्हणुन जवाबदारी सांभाळणारे कल्याण देशपांडे यांनाही बढती देत प्रदेश उपाध्यक्ष म्हणुन जबाबदारी देण्यात आली.

भाजयुमो शहर महामंत्री दिपांशु लिंगायत यांची प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे प्रदेश कार्यकारिणी सदस्य देवदत्त (देवा) डेहणकर यांना देखील प्रदेश सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली. प्रदेश सदस्यपदी रितेश राहाटे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. भाजयुमो शहर उपाध्यक्ष असलेले व्हि. एन. रेड्डी यांची अल्पावधीतच मोठी जवाबदारी देत, त्यांना भाजयुमो प्रदेश सोशल मिडीया सह-संयोजक पदी निवड करण्यात आली. या नव्या टीमने भविष्यात पक्षांनी दिलेले काम ताकदीने करण्याची ग्वाही दिली आहे.

SCROLL FOR NEXT