विदर्भ

नागपूर : उमरेडमध्ये २३ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त, एकास अटक,एक फरार

backup backup

 नागपूर; पुढारी वृत्तसेवा : उमरेड पोलीस स्टेशन हद्दीत सुमारे २३ लाख रुपयांचा प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखू गुटखा जप्त करण्यात आला. यामध्ये एका आरोपीस अटक करण्यात आली असून दुसरा फरार आहे. उमरेड येथील गोपाल किराणा दुकान येथे एलसीबी पथकाने छापामारी केली असता किराणा दुकान व गोडाऊनमध्ये हा माल आढळून आला. दिवसभर आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेरीस रात्री पोलिसांनी कुलूप तोडून ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जप्त मालामध्ये ईगल सुगंधीत तंबाखू, होला सुगंधीत तंबाखू, विराट सुगंधीत तंबाखू, माजा १०८ सुगंधीत तंबाखू, रत्ना ३०० सुगंधीत तंबाखू, पान पराग, सिल्व्हर पॅकेटमध्ये सुगंधीत तंबाखू असा एकूण २३,४७,६९५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

गोपाळ तुळशीराम चौधरी (वय ६१ रा उमरेड) असे आरोपीचे नाव आहे.फरार आरोपीचे नाव संदीप गोपाल चौधरी (वय ३५, रा. उमरेड असे आहे. पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.