चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथील काँगेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज (दि.३०) पहाटे निधन झाले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
खासदार धानोरकर यांचे आज पहाटे नवी दिल्ली येथे रुग्णालयात निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. दोन-तीन दिवसांपूर्वी मूत्रपिंडाच्या विकारामुळे प्रकृती गंभीर बनली होती. त्यामुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी चंद्रपूर वर्णी आर्मी मतदारसंघातून विजय मिळविला होता.
चंद्रपूरचे लोकसभा खासदार सुरेश उर्फ बाळु नारायणराव धानोरकर यांच्या निधनाने दुःख झाले. सार्वजनिक सेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेले योगदान स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना. ओम शांती, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून श्रद्धांजली वाहिली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनीही शोक संवेदना व्यक्त केली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने दुःख झाले. जनतेशी सखोल संबंध ठेवून, त्यांनी सामान्य माणसाच्या आशा पोहोचण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या निधनाने आपल्या सर्वांचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
हेही वाचा :