पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. आज (दि. १८) बुलढाण्यातील चिखलीत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केले. यावेळी मनसे नेते नितीन देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आंदोलनस्थळी २०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा दाखल झाला आहे.