Melghat Tiger Reserve : पर्यटकांनो हत्तीवरील जंगल सफारीसाठी तयार राहा! सुट्टीवर गेलेले हत्ती लवकरच सेवेत हजर Melghat Tiger Reserve
विदर्भ

Melghat Tiger Reserve : पर्यटकांनो हत्तीवरील जंगल सफारीसाठी तयार राहा! सुट्टीवर गेलेले हत्ती लवकरच सेवेत हजर

पुढारी वृत्तसेवा

अमरावती: पुढारी वृत्तसेवा ; मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हत्ती 10 जानेवारीपासून पंधरा दिवसांच्या सुट्टीवर गेले आहे. वर्षातून एकदा म्हणजेच पंधरा दिवस हत्तीच्या पायांचा मसाज केला जातो. त्यामुळे या पंधरा दिवसात हत्तीवरील दंगल सफारी बंद राहते. लक्ष्मी, चंपाकली, जयश्री आणि सुंदरमाला अशा या चार हत्तीणी १० जानेवारी पासून सुट्टीवर आहेत. त्या आता २४ जानेवारीला आपला मसाज पूर्ण करून आपल्या सेवेत पुन्हा हजर होणार आहे. (Melghat Tiger Reserve)

मेळघाटातील सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा अंतर्गत कोलकास येथे पर्यटकांच्या सेवेत हत्तीवरून पर्यटकांना जंगल सफारीची सुविधा पुरवली जाते. हत्तीवरून जंगल सफारी करीत असताना पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होत असतो. त्यातून व्याघ्रप्रकल्पाला चांगले उत्पन्न सुद्धा मिळते. मात्र, वर्षातून एकदा म्हणजे १५ दिवस हत्तींच्या पायाची मसाज करावयाची असते. त्याकरिता १५ दिवस हत्तीवर जंगल सफारी करता येणार नाही, असे सिपना वन्यजीव विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Melghat Tiger Reserve : लक्ष्मी, जयश्री, चंपाकली व सुंदरमाला याही सुट्टीवर

सिपना वन्यजीव विभागातील कोलकास संकुल येथे लक्ष्मी, चंपाकली, जयश्री आणि सुंदरमाला अशा या चार हत्तीणी आहेत. वर्षभर त्या हत्ती सफारी करिता पर्यटकांच्या सेवेत उपलब्ध असतात. मात्र, वर्षातील हिवाळा ऋतुमध्ये १५ दिवस त्यांना आरामासाठी सुट्टी दिली जाते. या दरम्यान त्याच्या पायांचा (चोपिंग) मसाज केला जातो. चोपिंग ही त्याच्याकरिता एक प्रकारची आयुर्वेदिक मसाज आहे. या 15 दिवसात सफारी व इतर कामे हत्तींना दिली जात नाही.

चोपिंग करताना संपूर्ण पारंपरिक पद्धतीने हिरडा, बीबा, सुंठ, फललितेल, डिकामाली, ओवाफुल, आसमानतारा, गुगळी, कुचला, तुरटी, सागरगोटी, आंबेहळद, या सारख्या २८ जडीबुटी पासून चुलीवर मिश्रण तयार करून हत्तीच्या पायांना शेक मसाज दिल्या जातो. त्यावेळी हत्तींना पूर्णपणे आराम दिला जातो. याकरिता सर्व पर्यटकांना दिनांक १० जानेवारी २०२३ ते २४ जानेवारी २०२३ पर्यंत बंद राहील याची नोंद घ्यावी, असे उपवनसंरक्षक सिपना वन्यजीव विभाग मेळघाट व्याघ्र प्रकल्प परतवाडा येथील दिव्या भारती यांनी कळविले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT